दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । सध्या राज्यामध्ये मुले पळवुन नेणारी टोळी आली असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण उद्भवत आहे. तरी या प्रकारची कोणतीही टोळी फलटण तालुक्यातील कोणत्याही भागात आलेली नाही. तरी नागरिकांनी कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार बोरसे यांनी केलेले आहे.
अशा प्रकारे जर कोणी संशयित व्यक्ती दिसला तर गावच्या पोलीस पाटील किंवा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (02166222533) या फोनवर अथवा पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे (9423012345) सपोनि भोसले (7738147796) पोउनि अरगडे (917038250707) मपोउनि धोंगडे (918975268220) या नंबरवर फोन करावा. कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींना मारहाण करू नये. मारहाण केल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करून मारहाण करणार्यावर कडक कारवाई करणार आहोत. याबाबत कोणीही जर अफवा पसरवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही पोलीस निरिक्षक गोडसे यांनी स्पष्ट केले.