माण तालुक्यात एलसीबी, म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई : 7.81 लाखांचा गांजा जप्त
स्थैर्य, सातारा, दि. 5 : माण माण तालुक्यातील बनगरवाडी गावच्या हद्दीत एका शेतात विक्रीसाठी चक्क अंमली पदार्थ गांजाची लागवड करण्यात आली होती. एलसीबी आणि म्हसवड पोलिसांनी या ठिकाणी संयुक्त कारवाई तीनजणांना अटक केली. संशयीतांकडून सुमारे 7 लाख 81 हजार 750 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 04 रोजी बनगरवाडी गावच्या हद्दीतील एकाने त्याच्या शेतामध्ये गांजा या अंमली पदार्थाच्या झाडांची लागवड करून करुन जोपासना करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ याठिकाणी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोनि सर्जेराव पाटील हे एलसीबीच्या पथकासह प्रथम म्हसवड येथे आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी म्हसवड पोलिस ठाण्याचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, तहसिलदार बाई माने यांनी संबंधित शेतात जावून पाहणी केली. यावेळी तीन जण शेतामध्ये गांजाच्या झाडांची पाने तोडत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी ही गांजाची झाडे विक्री करण्याकरीता लागवड केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून 7 लाख 81 हजार 750 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्यांच्या विरुध्द म्हसवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी (दहिवडी) एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे म्हसवड पोलीस ठाणे, उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, स. फौ. पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, पो.ना. अर्जुन शिरतोडे, रवि वाघमारे, अजित कर्णे, संजय जाधव, पंकज बेसके, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सातारा येथील ए. व्ही. कोळी सहायक पोलीस निरीक्षक फिंगरप्रिंट, पो. कॉ. खटावकर संतोष माळी, कुंभार, फोटोग्राफर मोहन नाचण, चा. पो. हवा. पिंजारी तसेच म्हसवड पोलीस ठाणेकडील पो.कॉ.काळे, वाघमोडे, काकडे यांनी नमुद कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.
कारवाईमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा, धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.