श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश; आंभियांत्रिकच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या परिक्षा नाहीत


स्थैर्य, फलटण, दि. १ : विधानपरिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश आले असून आंभियांत्रिकच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या परिक्षा न घेता मार्ग काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांंनी विद्यापिठाला त्या बाबत आदेश दिलेले आहेत. 

ग्रामीण भागातील मुलांनी पुणे अथवा मुंबई येथे आंभियांत्रिकच्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंभियांत्रिकच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा होणार असे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु पुणे अथवा मुंबई येथे जाऊन परीक्षा देणे शक्य नसल्याचे विधानपरिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती आणि श्रीमंत रामराजे यांंनी लक्ष घातले श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र व्यवहार आणि फोन करून परीक्षा न घेता मार्ग काढण्यासाठी सुचना केली आणि मंत्री महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा न घेण्याविषयी विद्यापीठाला सांगितले आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील मुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत झाली त्या बाबत त्यांचे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून आभार मानले जात आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!