
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4.30 वा. दरम्यान सातारा येथील आर्य लोक हॉस्पिटल, गोडोली येथील पार्किंगमध्ये पार्क केलेली सोनाली पांडुरंग कुंभार रा. खेड, ता. सातारा यांची टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी क्रमांक एमएच 11 सीवाय 8345 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.