दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । सातारा । येथील रविवार पेठेमध्ये एका दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जून रोजी 7 ते 10 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठेमध्ये एका दुकानाच्या समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. 11 एटी 8748 अज्ञात चोरट्याने बनावट चावी वापरून चोरून नेल्याची तक्रार नानू रूपाली राठोड वय 45, रा. मतकर कॉलनी आयटीआय रोड सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस हवालदार सणस तपास करत आहेत.