दैनिक स्थैर्य । दि. १३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरातून दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते सव्वा आठ दरम्यान करंजे नाका म्हसवे रोड येथून डॉ. आदित्य सुभाष हिरवे वैतीस रा. राधिका रोड, सातारा यांच्या मालकीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच 24 एजे 1909 अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पो. हवा. कदम करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत सुरज कृष्णात वाघमारे वय 34 राहणार माची पेठ सातारा यांची युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 50 जी 2439 ही बिल्डिंगच्या पार्किंग मधून दिनांक 10 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करीत आहेत.