दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातून तीन विविध ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरुना नेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२१ रोजी सव्वा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कलेढोण, ता. खटाव गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी (एमएच ११ बीजी २६२८) चोरुन नेल्याची तक्रार भाऊसाहेब महादेव बोटे, रा. सातेवाडी, ता. खटाव यांनी वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. १६ रोजी सातारा येथील बसस्थानक समोरील रस्त्याकडेला असलेल्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी (क्रमांक समजू शकला नाही) चोरुन नेल्याची तक्रार कुमार सुनील देशमुख, रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. तिसऱ्या घटनेत दि. १९ ते २० जून दरम्यान सातारा येथील गुरुवार पेठेत असणाऱ्या एलबीएस कॉलेज जवळ, घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्र. एम. एच. ११ सीए ५१११ अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार शामराव सुदाम आवळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.