सैनिक स्कूलमधून चंदनाच्या झाडांची चोरी


स्थैर्य, सातारा, दि.१४: येथील सैनिक स्कूलच्या आवारातून चंदनाचे झाड तोडून त्यातील खोड चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सैनिक स्कूलच्या आवारातच मॉडेल एअर क्रॉफ्ट असून त्याच्या समोर असणारे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने तोडून त्यातील दोन हजार रुपये किमंतीचे खोड चोरुन नेले. ही घटना दि. 11 जून रोजी रात्री अकरा ते पहाटे दोन या वेळेत घडली आहे. याबाबतची तक्रार आनंद अनंतराव कमलापूरकर (वय 52, रा. स्टार्फ क्वॉर्टर्स, सैनिक स्कूल, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक झेंडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!