लॉकडाऊनमध्ये बंद बसलेल्या कंपनीतून 6 लाखांच्या साहित्याची चोरी; वाई येथील प्रकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । वाई । बोपर्डी, ता. वाई येथील साईपर्न शीट प्रा. लि. ही कंपनी लॉकडाऊन काळात मार्च 2020 पासून बंद होती. या कालावधीत चोरट्याने 6 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची साईपर्न शीट प्रा. लि. ही कंपनी वाई येथील बोपर्डी येथे दीड एकरात आहे. बाहेरुन वॉल कंपाऊंड आहे. लॉकडाऊन काळात कंपनी मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आली आहे. या कंपनीची देखरेख करण्यासाठी मॅनेजर नेमण्यात आला आहे. तसेच सुरक्षा रक्षकही नेमण्यात आला आहे. मॅनेजर अनिल देव हा पंधरा दिवसाला फोन करुन कंपनीबाबत माहिती देत होता. मात्र दि. 15 जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा फोन आला की कंपनीतले साहित्य चोरीला गेले आहे. त्यावरुन संजय मोरे यांनी त्यांचा भाऊ रुपेश मोरे यांस तेथे जावून पाहण्यास सांगितले.

रुपेश मोरे यांनी कंपनीतील साहित्याची चोरी झाल्याचे सांगताच संजय मोरे यांनी येवून कंपनीची पाहणी केली असता साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये 15 हजार रुपयांचा संगणक, 500 रुपयांचे पॅनेल बोर्ड, 5 हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटर, 38 हजार रुपयांचे मशिनमधील ल्युमिनिअम, 2500 रुपयांचे जर्मन डाय हार्ड डिस्क, 1 लाख 25 हजार रुपयांचे स्पेअर पार्ट, एक हजार रुपयांचे लोखंडाचे मशीन कनवेअर स्पेअर पार्ट, 3 हजार रुपयांची चिलिंग प्लॅन्टमधील इलेक्ट्रीक मोटर, 3500 रुपयांच्या किलोस्कर कंपनीच्या 3 जनरेटरमधील एक इलेक्ट्रीकल मोटर, 5 हजार रुपयांच्या 150 लीटरच्या मिक्सरमधील ग्राईडंर इलेक्ट्रीकल मोटर, 5 हजार रुपयांच्या शिट्स स्वरुपात देणारी फॅमिंग मशिनमधील लोखंडी, ऍल्युमिनिअम पार्ट, 5 हजार रुपयांच्यो हलअप टोमटिक मशिनमधील लोखंडी व स्टीलचे पार्ट, 10 हजार रुपयांचे मायक्रोमीटर व चेकींग साहित्य, 1 लाख 75 हजारचे पीव्हीसी शीट्स तयार करण्याकरता लागणारा कच्चा माल, 2 लाख रुपयांचे तयार झालेले ग्रेका, जीआय इंडस्ट्रीयल प्रोफाईल, 10 हजार रुपयांच्या एक सोफा सेट व दोन लेदरच्या खुर्च्या, असा एकूण 6 लाख 8500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली असून याचा तपास हेड कॉन्स्टेबल विजय शिर्के हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!