
दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । माण । माण तालुक्यातील पळशी येथील शेळके वस्ती जवळील माणगंगा नदीपात्रावर असणार्या के टी पद्धतीच्या बांधार्यावरील संरक्षण पाईप आणि उभे अँगलची चोरी झाली असल्यामुळे पूल अतिशय धोकादायक बनला आहे. हा पूल नदीच्या दोन्ही भागातील जनतेसाठी ये जा करण्यासाठी के टी पद्धत वापरली आहे. जनावरे आणि शाळकरी मुले यांना ये जा करण्याच्या हेतूने हा पूल बांधण्यात आला होता. परंतु संरक्षण पाईप आणि अँगल चोरीला गेल्यामुळे हा पूल पूर्णपणे धोकादायक बनला आहे. त्यामुळे फार मोठा अपघात होऊ शकतो. आणि जीवीतहानी होऊ शकते. या शेट्टी बंधार्याच्या आवारामध्ये वाळू चोरी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. वाळू चोर रात्री-अपरात्री या पात्रांमध्ये पडून असतात. त्यांच्यासोबत अनेकजण असतात. त्यामुळे या बांधावरील संरक्षण लोखंडी पाईपा आणि अँगल वाळू चोर आणि त्याच्या साथीदाराने चोरले असल्याची त्या परिसरातील लोकांची तक्रार आहे. कारण रात्री-अपरात्री त्या ठिकाणी वाळू चोरा शिवाय दुसरे कोणीच नसते. लोखंडी पापा आणि अँगल हे कमीत कमी एक ते दीड लाखापर्यंत मटेरियल होते. त्यामुळे या चोरांना लवकरात लवकर पकडून. त्यांच्यावर कारवाई करावी व नदीवरील पाईपा आणि अँगल पुन्हा बसवून द्यावे. अशी मागणी पळशी येथील ग्रामस्थांनी माण तहसीलदारांकडे केली आहे. जर येत्या काही दिवसात या चोरांवर जर कारवाई नाही झाली तर पळशी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत