जाधववाडी येथे ट्रॅक्टरमधील ५८०० रुपयांच्या साहित्याची चोरी


दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जाधववाडी (ता. फलटण) येथे ११ सप्टेंबरच्या रात्री हर्षद गजानन जाधव (वय २४, रा. जाधववाडी) यांच्या राहत्या घराच्या बाजूला लावलेला ट्रॅक्टर (नं. एमएच-११-सीक्यू-९७२८) मधील टुलकिट, जॅक, टेप व साऊंड असे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद जाधव यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीत एकूण ५,८०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. या चोरीचा अधिक तपास पो.हवा. सचिन जगताप करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!