
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । शिरवळ येथून सुमारे दोन लाखांच्या धान्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 ऑक्टोबर च्या सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने राजकुमार सुखदेव कोळी वय 30 राहणार मांडीचा ओढा, शिरवळ, तालुका खंडाळा यांच्या शिवारात ठेवलेली गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाची पोती आणि 38 हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण एक लाख 84 हजार शंभर रुपयांची चोरी केली आहे. याबाबतचा गुन्हा शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पोलीस नाईक ए. बी. पाटणकर तपास करीत आहेत.