दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । सातारा । येथील जूनी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गणेश चौकातलगतच्या रिकाम्या जागेत चरत असलेल्या आठ शेळ्यांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आवर गुन्हा दाखल झाला आहे. या शेळ्यांची किमंत २८ हजार रुपये आहे. ही घटना मंगळवार, दि. ६ रोजी घडली.
याबाबत मंगल विश्वनाथ माने (रा. धनगरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, मंगल माने या मेंढपाळ असून त्यांच्याकडे आठ शेळ्या होत्या. मंगळवारी त्यांनी आपल्या शेळ्या जुनी एमआयडीसी परिसरातील गणेश चौकातलगत असलेल्या रिकाम्या जागेत चरण्यासाठी सोडल्या होत्या. मात्र, येथून त्या चोरीला गेल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.