दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील महावितरणचा डी.पी. दि. ४ सप्टेंबरच्या रात्री फोडून त्यातील ऑईल सांडून कॉपर वायर चोरून नेली असल्याची फिर्याद वायरमन दिलीप रोडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील महावितरणचा डी.पी. दि. ४ सप्टेंबरच्या रात्री खाली पाडून त्यातील २ हजार रुपये किंमतीचे ४० लिटर ऑईल सांडून नुकसान केले व त्यातील २० हजार रुपये किमतीची ५० किलो वजनाची कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी नेल्याची फिर्याद पोलिसात वायरमन दिलीप रोडे यांनी दिली आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार चांगण करीत आहेत.