रेल्वे लाईनवरील ट्रान्सफॉर्मर खाली पाडून ऑइलचे नुकसान करून २०० किलो वजनाच्या कॉपर वायरची चोरी


दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२३ | फलटण |
सुरवडी (तालुका फलटण) येथील रेल्वे लाईनवर असणार्‍या रेल्वे स्टॅन्डजवळील ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून त्यातील ४० लिटर ऑइल (१०,०००/-रुपये किमतीचे)जमिनीवर खाली सांडून नुकसान करून त्यातील २०० किलो वजनाची २०,०००/-रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली आहे. ही घटना १२ डिसेंबर २०२३ रोजीचे सायंकाळी ५.०० वाजता ते दि. १३ डिसेंबर २०२३ रोजीच्या सकाळी ०९.०० वाजेदरम्यान घडल्याचे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या चोरी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ह. पिसे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!