
दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । सातारा । सातारा शहरानजिक असलेल्या वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करंजे तर्फ साताराच्या हद्दीत रानमळा येथे वीज कंपनीचा ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मरमधील ऑईल सांडून त्यातील १ लाख ५ हजार रुपये किंमतीची ४७५ किलो वजनाची तांब्याची तार चोरुन नेण्यात आली. याप्रकरणी विजय फाळके यांनी तक्रार दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार डमकले हे करीत आहेत.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					