फलटणमधील सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडावूनमध्ये चोरी; दोघा कामगारांविरोधात तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या महाराजा मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या गोडावूनमध्ये दुकानातीलच कामगारांनी चोरी करून गोडावूनमधील सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची फिर्याद गोडावूनचे मालक विष्णू पांडुरंग सूळ (वय ४९, रा. रामटेक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीत चोरट्यांनी ६ फ्रिज, ३ आटाचक्की व एक एलईडी टीव्ही लंपास केली आहे. या चोरीप्रकरणी दुकानमालक विष्णू सूळ यांनी दुकानातील कामगार अजय कैलास चव्हाण व श्रेयस रोकडे (दोघेही रा. गिरवी, ता. फलटण) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार पूनम वाघ करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!