खामगावच्या ५ सर्कलमध्ये चोरी; सोने व रोख रक्कम असे एकुण नऊ लाख ३० हजारांचा माल लंपास


स्थैर्य, फलटण, दि. १८ : खामगाव, ता. फलटण येथील ५ सर्कल येथुन राहत्या घरातुन अज्ञात चोरट्याने नऊ लाख पाच हजार ३१० रूपयांचे सोने व रूपये पंचवीस हजार असा एकुण नऊ लाख ३० हजार ३१० रूपायांचा माल लांबवला असल्याची घटना घडलेली आहे. या बाबतची फिर्याद शोभा माणिक पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करित आहेत, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक नितीन सावंत यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!