चोऱ्या, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । कऱ्हाड ।  चोऱ्या, फसवणूक करणाऱ्या टोळीची एक चूक पोलिसांच्या रेकॉर्डवर आली अन् तोच धागा पकडून पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला. सातारा जिल्ह्यात डोकेदुखी ठरलेली परराज्यातील बनावट सोने विकणाऱ्या भामट्यांची टोळीला कऱ्हाड पोलिसांनी गजाआड केले. कोणताही पुरावा नसताना केवळ भामट्यांचा अंदाज आल्याने, टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून बारापेक्षाही जास्त फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर जिल्ह्यात अशी टोळी आलीच नसल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डला नोंद आहे.

सोन्याच्या खाणीतील कामगार आहोत, खाणीतील खनिज खोदताना सापडलेले सोने विकण्यासाठी आलो आहे, असे सांगून कऱ्हाडसह सातारा जिल्ह्यातील विविध गावांतील महिला, ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांनाही भावनिक करून त्यांनाच गंडा घालणाऱ्या टोळीने अक्षरशः धुडगूस घातला होता. कोण आहेत, त्यांचे वर्णन काय? याची काहीच माहिती पोलिसांच्या हाती नसताना टोळीचा पर्दाफाश केला. तो केवळ डमी खरेदीदारामुळेच.

फसवणूक झालेली व्यक्ती आली, की त्यांच्याकडून पोलिस माहिती घेत होते. खबऱ्याद्वारे सोन्याच्या दागिन्याची तस्करीद्वारे विक्री करणारे भागात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. डमी खरेदीदार तयार करून त्याद्वारे सापळा रचून पाच जणांच्या टोळीचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. कऱ्हाड शहर, तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे १३ हून अधिक ठिकाणी बनावट सोने विकल्याचे तपासात समोर आले. सोन्याचे म्हणून पितळेचे दागिने विकले होते. तेच दागिने विकताना त्यांचा घात झाला अन् ते पोलिसांच्या हाती सापडले.


Back to top button
Don`t copy text!