सदरबझार येथे तीन ठिकाणी चोरी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । सदरबझार, साातरा येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी करुन ६३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ ते दि. ५ जानेवारी दरम्यान सदरबझारमधील कांगा कॉलनी येथील अनु प्लाझा बिल्डिंगमधील बंद असलेल्या श्री मेडिकल जनरल स्टोअर्सची एक बाजु उचकटुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मेडिकल शेजारी असणाऱ्या उमेश महादेव मोहोटकर यांच्या प्रोटिन दुकानातुन १८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच शितल अविनाश कदम यांच्या श्री क्लिनिकमधुन १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण ६३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याबाबत अभिजीत सदानंद पाटील रा. कांगा कॉलनी, सदरबझार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबतचा अधिक तपास पो. हवालदार मोहिते हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!