पोलीस असल्याची बतावणी करून युवकाला लुटले


दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । सातारा । पोलीस असल्याची बतावणी करून गुरुवार पेठेतील एका इसमाला दोघांनी लुटल्याचा प्रकार दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता जुन्या औद्योगिक वसाहतींमध्ये व तारीख कोल्डस्टोरेज येथे घडला आहे. याप्रकरणी लक्ष्मण महादेव साळुंखे व 18 रा. गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार लक्ष्मण साळुंखे हे आपल्या मोटारसायकल वरून जात असताना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन युवक तेथे आले आणि आम्ही पोलीस असल्याचे सांगून लागले. लक्ष्मण साळुंके यांनी आपली दुचाकी बाजूला घेतली. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या हातातील 80 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हिसकाऊन तेथून पलायन केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, हवालदार सुतार अधिक तपास करत आहे.


Back to top button
Don`t copy text!