दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | मसाप फलटण शाखेचे अजीव सदस्य व जाधववाडी ता. फलटण येथील युवा कवी अविनाश चव्हाण यांची ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रित कवींच्या कवी समेंलनासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर असून स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ आहेत. कवीवर्य श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून याठिकाणी अविनाश चव्हाण आपली कविता सादर करणार आहेत. याबद्दल मसाप शाखा फलटणच्या वतीने मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यीक व पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, दै. नवराष्ट्र फलटण प्रतिनिधी सुभाषराव भांबुरे, मसाप फलटणचे कार्यवाह ताराचंद्र आवळे, लाईफ वे फायनान्शियलचे प्रमुख विशाल कदम यांनी अविनाश चव्हाण यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश चव्हाण युवा कवी म्हणून सर्व परिचित आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध साहित्य व कवी समेंलनामध्ये कविता सादर करुन आपला वेगळा ठसा उमटविला आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माणगंगा साहित्य परिषद आयोजित पाडेगाव येथील पहिल्या’ युवा स्पंदन’ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तसेच यापूर्वी विविध कवी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
“दोन शब्द” हा त्यांचा कविता संग्रह यापूर्वी प्रकाशीत झाला असून त्याची प्रस्तावना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य स्व. शिवाजीराव भोसले यांची आहे. त्यांनी विविध व्रुत्तपत्रे व दिवाळी अंकामध्ये लेख लिहिले आहेत. त्यांच्या कविताही अनेक कवी समेंलनामध्ये गाजल्या आहेत.
या अभिनंदनीय निवडी बद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सिटीझन जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेशभाई सावंत, फलटण नागर परिषद विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अजय माळवे, अनुप शहा, अँड. शहाजी लोखंडे, पत्रकार निलेश सोनवलकर, शिवसेना फलटण तालुका प्रमुख स्वप्नील मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अविनाश चव्हाण यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.