
दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । फलटण । २१ जून जागतिक योग दिनानिमित्त फलटण येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा, ढवळ येथील क्रीडांगणावर योग सत्राचे आयोजन केले होते.या सत्रात जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी एकत्रित उपस्थित होते.तसेच योगा दिनाचे अवचित्य साधत कृषिदूत सिद्धांत गायकवाड,रुपेश ठाकरे, वरद लोळगे, किशोर गांगुर्डे, सुरज काळे, स्वप्निल अठराबुध्दे,प्रशांत गायकवाड, यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.सत्राच्या शेवटी कृषिदूतांनी आपल्या जीवनात योगाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कारण योगामुळे लोकांना लवचिक राहण्यास मदत होते, चिंताग्रस्त समस्या कमी होतात, प्रतिकारशक्ती वाढते आणि श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत होते