दि यशवंत को – ऑप. बँक लि., फलटणच्या चेअरमनपदी शेखर चरेगावकर, व्हा. चेअरमनपदी अजित निकम बिनविरोध


दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२२ । फलटण । दि यशवंत को – ऑप. बँक लि., फलटणच्या चेअरमनपदी शेखर सुरेश चरेगांवकर यांची बिनविरोध फेर निवड झाली असून व्हा. चेअरमनपदी अजित गणपतराव उर्फ बबनराव निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून त्यानंतर झालेल्या नव निर्वाचित संचालक मंडळ पहिल्याच बैठकीत वरीलप्रमाणे चेअरमन, व्हा. चेअरमन निवड एकमताने बिनविरोध पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा उमेश ज. उमरदंड हे होते.

संचालक मंडळात शेखर सुरेश चरेगांवकर चेअरमन, अजित गणपतराव उर्फ बबनराव निकम व्हा.चेअरमन, संचालक सर्वश्री नानासाहेब बाजीराव पवार, प्रदीपकुमार गोविंदराव शिंदे, श्रीकृष्ण वसंतराव जोशी, संदीप प्रभाकर इंगळे, अवधुत रामकृष्ण नाटेकर, प्रसाद श्रीराम देशपांडे, सचिन विष्णु साळुंखे, गोपीनाथ भालचंद्र कुलकर्णी, महेशकुमार जगन्नाथ जाधव, जयवंतराव यशवंतराव जगदाळे, परशुराम गुंडाप्पा जंगानी, सुहास म्रुगेद्र हिरेमठ, सौ. अनघा प्रशांत कुलकर्णी, सौ. कल्पना अमित गुणे, अड. विशाल चंद्रहास शेजवळ (तज्ञ संचालक) यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित चेअरमन/व्हा. चेअरमन व संचालकांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!