दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२३ । मुंबई । हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
पालकमंत्री श्री. भुसे यांनी आज वायफळ टोलनाका ते मालेगाव टोल प्लाझा (CP 1 ते 05) 238/850 कि.मी त्यांनतर मालेगाव टोल प्लाझा ते भरवीरपर्यंत (CP 05 ते 013) 238/850 कि.मी. समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी भरवीर टोल प्लाझा येथे पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक १ अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक २ संजय यादव, मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी यांच्यासह विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, समृध्दी महामार्गाचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी भरवीरपासून पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. कामांच्या पूर्ततेनुसार वेळोवेळी छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.