श्री शिवप्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : दिलीपसिंह भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 24 मार्च 2025 | फलटण | श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान कार्य मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलटण मध्ये सुद्धा श्री शिवप्रतिष्ठानचे कामकाज अतिशय कौतुकास्पद सुरू असल्याचे मत फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने रक्तदान महायज्ञचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये तब्ब्ल ७०९ जणांनी रक्तदान केले.

यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, फलटण शहरामधील श्री हणमंतराव पवार विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गतवर्षी विद्यार्थ्यांसाठी श्री श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून लाठी काठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते. तरी यावर्षी म्हणण्यापेक्षा प्रतिवर्षी लाठीकाठी प्रशिक्षणाचे आयोजन श्री हणमंतराव पवार विद्यालयाच्या रांगणामध्ये करावे असा आग्रह संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी श्री शिवप्रतिष्ठानकडे करीत आहे.

फलटण शहरासह तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून जे धारकरी काम करीत असतात त्या सर्व धारकऱ्यांना एकत्रित करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाच्या निमित्ताने रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गरजू व्यक्तींना रक्त देण्याचे प्रयोजन श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे हा महायज्ञ सोहळा नक्कीच मोठ्या प्रमाणावर फलटणमध्ये पार पडेल, असे मत सुद्धा यावेळी भोसले यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!