स्थैर्य, फलटण, दि.२५: मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ या व्हायरस ने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला. त्या नंतर कोरोना आजरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. कोरोनाचा एकदा पेशंट समोर आल्यावर कोरोना पेशंट व त्याचे निकटवर्तीय यांच्यामध्ये बरेच गैरसमज असायचे. हे गैरसमज दूर करणे हे अत्यंत आवश्यक होते. एकदा व्यक्ती जर कोरोनाबाधित झाला त्याच्याकडे स्थानिक लोकांकडून वेगळ्या पद्धतीने वंगीवीले जायचे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती व त्याचे निकटवर्तीय यांचे मानसिक संतुलन ढासळले जाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणावर होते. या काळामध्ये कोरोना आजाराविषयी सत्य व सद्य परिस्थिती कोरोनाबाधित व्यक्ती व त्याचे निकटवर्तीय यांना समजावून सांगून त्यांचे समपुदेशन करणे अत्यंत गरजेचे होते. या करीत फलटण येथे संदीपकुमार जाधव यांनी कोरोनाबाधित व्यक्ती व त्यांचे निकटवर्तीय यांचे योग्य प्रकारे समपुदेशन करून त्यांना मासिक स्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले व जाधव यांचे कार्य हे कौतुकास प्राप्त आहे असे मत फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केले.
फलटण उपविभागामध्ये ऑगस्ट २०२० मध्ये कोव्हीड १९ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. तसेच या समुपदेशन केंद्रामध्ये काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व समुपदेशन विषयी माहिती असलेल्या स्वयंसेवकांना एकत्र करून हा प्रकल्प सुरु करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वी रित्या चालवल्या बद्दल संदीपकुमार जाधव यांच्या टीमचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. या वेळी फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण तालुक्यात कोव्हीड १९ विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न आपण सर्व जण करत होता. या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, फ्रन्टलाइन वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने आपण यशस्वी रित्या काम करू शकलो. या कामांमध्ये कोव्हीड १९ समुपदेशन केंद्र यांचेही काम उल्लेखनीय आहे. आगामी काळामध्ये जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा नव्या जोमाने आपल्या सर्वांना काम करायचे आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी व्यक्त केले.
यावेळी समुपदेशन केंद्राचे संदीपकुमार जाधव, सुशांत चोरमले, विजय जाधव, प्रसाद बिडवे, डॉ. संतोष भिसे, मोनाली गिड्डे व प्रीती भोजने यांना सन्मानपत्र व औषधी झाडांचे रोप देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशन केंद्राचे समन्वयक सुशांत चोरमले व आभार प्रदर्शन प्रसाद बिडवे यांनी मानले.