
स्थैर्य, बारामती, दि. 29 ऑगस्ट : वृक्षारोपण,रक्तदान शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना मदत आणि दहीहंडी उत्सवाचे आयोजन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवणे व व प्रत्येक कार्याची सुरुवात शिव वंदना घेऊन करणे आदी सामाजिक कार्यामुळे पैलवान ग्रुप बारामतीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रविवार (दि.24) ऑगस्ट पैलवान ग्रुप बारामती, पै.आकाश शेरे पाटील मित्र परिवार व इलाईट फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब यांनी आयोजित दहीहंडी महोत्सवच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर बोलत होते. या प्रसंगी ‘चांडाळ चौकटीच्या करामती ’ मधील कलाकार सुभाषराव मदने, रामभाऊ जगताप, राष्ट्रवादीचे जय पाटील, प्रताप पागळे, अविनाश बांदल, अतुल बालगुडे, राज्याच्या दिव्यांग विभागाच्या राज्य सल्लागार नीता ढवाण, धनंजय जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. गोपाळ भक्तांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती व पर्यावरण याची जोपासना व्हावी, यासाठी या उत्सवाचे आयोजन केल्याचे पैलवान आकाश शेरे पाटील यांनी सांगितले. शिवशंभो दहीहंडी संघाने दहीहंडी फोडून विजेतेपद मिळवले. या वेळी दहीहंडी संघासाठी शिववंदना सादर करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.