स्वच्छता क्षेत्रात पाचगणी पालिकेचे काम कौतुकास्पद; स्वच्छ भारत मिशनचे संचालक बिनयकुमार झा यांच्याकडून शाबासकीची थाप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । सातारा । जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र असूनही फ्लोटिंग पॉप्युलेशन मूळे उदभवणारार्‍या समस्यांवर मात करून पाचगणी शहराने स्वच्छता क्षेत्रात आदर्शवत काम उभारले आहे. या पालिकेची स्वच्छता क्षेत्रातील कामगिरी प्रशंसनीय असून पाचगणीला सर्वतोपरी सहकार्य करू, असे अभिवचन स्वच्छ भारत मिशन संचालक बिनय कुमार झा यांनी काढले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाचगणी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भेटीसाठी झा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय टीम पाचगणी शहरात आली होती यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पालिकेने राबविलेल्या विविध उपक्रम या पथकाला दाखवले. पालिकेने उभारलेल्या स्वच्छ भारत पाँइंटचे श्री झा यांनी तोंड भरून कैतुक केले.

यावेळी या पथकाने पाचगणीत 100 टक्के कचरा विलगीकरण होतो का याची पाहणी केली.कचरा विलगीकरणाबाबत पालिकेने राबविलेल्या उपक्रमाची झा यांनी विस्तृत माहिती घेतली. सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचर्‍याचे विघटन, एसटीपी प्लॅन्टची पाहणी या पथकाने केली. शहरातील संपूर्ण स्वच्छतेची देखील झा यांनी माहिती घेतली. स्वच्छ भारत पॉईंट वर उभारण्यात येणार्‍या बायोगॅस प्रकल्पाची देखील त्यांनी माहिती घेतली.

यावेळी झा यांनी पालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानात सातत्य ठेवल्याबद्दल नगराध्यक्ष व कर्मचारी पर्यटक आणि पाचगणीकरांचे विशेष कौतुक केले. तसेच पाचगणी पालिकेच्या नाविन्यपूर्ण तसेच अनुकरणीय उपक्रमांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे अभिवचन देखील झा यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!