
मुस्लिम सेवा समिती यापुढेही मदतीसाठी प्रयत्नशील – प्रा.अशफाक पटेल, मुबारक तांबोळी
स्थैर्य, जुन्नर, दि. ०७ : जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समितीच्यावतीने बकरी ईदच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री कोविड सेंटरचे डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांसह जुन्नर तालुक्यातील मस्जिदींचे मौलाना साहेब यांना मास्क, फेस शिल्ड, हॅडग्लोज, सॅनिटायझर पेन, सॅनिटायझर बाॅटल व साबण अशा परिपुर्ण आरोग्य सुरक्षा किटचे वाटप तहसिलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, लेण्याद्री कोविड सेंटरचे डाॅ.शाम बनकर, कोविड सेंटर डाॅक्टर, नर्सेस व जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटपाचा शुभारंभ लेण्याद्री कोविड सेंटर येथुन करण्यात आला.
यानंतर अंजुमन हायस्कुल जुन्नर येथे शहरातील सर्व मस्जिदींचे मौलाना साहेबांना प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करुन आरोग्य सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना तहसिलदार कोळेकर यांनी जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समितीच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक करत कोविड सेंटरला समाजातील दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे अावाहन केले.
तर समितीचे सहसचिव प्रा.अशफाक पटेल म्हणाले की, जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समितीच्यावतीने बकरी ईदनिमित्त होणार्या खर्चाची बचत करुन हा उपक्रम राबवण्यात आला असुन यापुढील काळातही समिती आवश्यक ती मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करेल असे आश्वासन यानिमित्तानं दिले
यानिमित्तानं समितीचे पदाधिकारी सादिक आतार, रऊफ खान, मुबारक तांबोळी,समद इनामदार,सईद पटेल, रइस मनियार, अकबर पठाण, रउफ इनामदार,रिजवान पटेल, प्रा.अशफाक पटेल, जनाब अकबर बेग, कासम पटेल,फिरोज पठाण, वाहिद इनामदार, राजु मोमिन,अंजुमन हायस्कुलचे प्राचार्य हाजी पापा तांबोळी, हाजी कदिर मोमिन, अन्सार शेख, हाशिम मलिक, जावेदभाई शेख उपस्थित होते.
सदर कार्यक्रम समितीचे संस्थापक आसिफ महालदार,सचिव मेहबूब काझी,सल्लागार ॲड. गफुर पठाण, हाजी गुलामनबी शेख, ॲड. सलिम पटेल,हाजी अब्दुल रज्जाक कुरेशी,फकीरआतार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशफाक पटेल व मुबारक तांबोळी यांनी केले तर आभार रऊफ खान यांनी मानले.