ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे – मराठी साहित्य मंडळाची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । आटपाडी । सांगली जिल्ह्यामधील आटपाडी  जन्मगावी जन्मशताब्दी काळात ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी मराठी साहित्य मंडळाने नुकतीच केली आहे.
सातारा येथील कवयित्री हेमा जाधव यांच्या आई कवितासंग्रह च्या प्रकाशन सोहोळा निमित्ताने राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केले होते, याच कार्यक्रमामध्ये कराड येथील ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव यांनी ठराव मांडला आणि त्यास मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी त्यास अनुमोदन दिले व हा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
उपस्थितांमध्ये चित्रपट निर्माते दिग्दर्शक गणेश शिंदे, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, नाशिक येथील कवयित्री ललिता गवांदे, पुणे ज्येष्ठ लेखक बबन पोतदार, ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष विश्वास नेरकर , ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, कराड, सुनील काटकर, आकाशवाणी विभागाच्या सोनाली बंड, अर्चना पवार, सुरेखा भालेराव,उस्मानाबादचे सिद्धेश्वर कोळी  ,बीड चे संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते
केवळ ठराव पास करून गप्प बसणार नाही तर मुख्यमंत्री माँ उद्धव ठाकरे यांच्याकडे मी व्यक्तिशः पाठपुरावा करणार आहे , असे मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Back to top button
Don`t copy text!