महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्य कौतुकास्पद – अजित पवार


दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। बारामती । उद्योजकांच्या, व्यापार्‍यांच्या स्थानिक विविध समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे तसेच उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांच्यासाठी नेहमी कृतिशील उपक्रमाचे आयोजन करत असलेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या बारामती विभागीय कार्यालयाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल वर्षापूर्वी अहवालाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अजित पवार बोलत होते

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील, बारामती कार्यालयाचे अधीक्षक अभियंता विजय पेटकर, चेंबरचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी, व्हा. चेअरमन सुशीलकुमार सोमाणी, सदस्य मनोज तुपे, अ‍ॅड पी. टी. गांधी, सुरेश परकाळे, विलास आडके, जगदीश पंजाबी, महेश ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योजकांच्या उत्पादन निर्यातीसाठी लागणारी सर्टिफिकेट ऑफ ओरीजनची सुविधा प्राप्त करून देणे, लघु ,सूक्ष्म ,मध्यम उद्योजकांसाठी शासनाचे व बँकांचे व तज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व गुणवंत उद्योजकांना उद्योग मित्र पुरस्कार देऊन सन्मान करणे आदी कार्यक्रम वर्षभरात घेऊन महाराष्ट्र चेंबर्सने वेगळेपण जपले असल्याचे चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!