जैन सोशल ग्रुपचे कार्य कौतुकास्पद – रिना शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२४ | फलटण |
जागतिक महिला दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्यामार्फत जैन समाजातील धार्मिक कार्य, त्यागी सेवा या कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या महिलांचा सन्मानचिन्ह, मोत्यांची माळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलिस निरीक्षक शहा यांच्या सुविद्य पत्नी रिना शहा उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी जैन सोशल ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन जैन सोशल ग्रुपचे कार्य कौतुकास्पद असल्याचे रिना शहा यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमास विनया वर्धमान शहा, सुनीता विजयकुमार दोशी, पूजा निनाद भुता, संगिता सुरेंद्र दोशी, प्रज्ञा प्रविण शहा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सविता दोशी होत्या.

यावेळी जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रितम शहा, खजिनदार समिर शहा, सहखजिनदार नीना कोठारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मगेश दोशी, राजेंद्र कोठारी, संगीनी फोरम अध्यक्षा अपर्णा जैन, आदेशचे संपादक विशाल शहा, जैन सोशल ग्रुप संचालक डॉ. मिलिंद दोशी, डॉ. अशोक व्होरा, सचिन शहा, प्रीतम गांधी, हर्षद गांधी व जैन सोशल ग्रुप सदस्य व श्रावक-श्राविका उपस्थित होते. पूजा भुता यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन दिशा शहा यांनी केले. आभार सचिव प्रितम शहा यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!