स्थैर्य, खटाव. दि. ३१ (विनोद खाडे) : केंद्रीय मानव अधिकार संघटन आणि भारतीय माहिती अधिकार हे माध्यमातून सुद्धा अन्यायला वाचा फोडण्याचे काम करत असल्याचे मत केंद्रीय मानवाधिकार संघटन चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, व भारतीय माहिती अधिकारचे जिल्हा संपादक अतुल पवार यांनी व्यक्त केले.
वडूज येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव, खटाव तालुकाअध्यक्ष सोमनाथ साठे, माण तालुकाध्यक्ष सचिन पाटोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सर्वसामान्य नागरिकांसाठी आमची संघटन कायम तत्पर असून संघटने विषयी पूर्ण चौकशी केल्या शिवाय कुणी ही नाहक बदनामी करू नये.जर संघटन मधील एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर ते ही पुराव्यानिशी द्यावे, अन्यथा विनाकारण हेतू पुरस्कर पध्दतीने जर कुणी बदनामी करत असेल तर निश्चितच निषेधार्थ आहे. असेही पवार यावेळी म्हणाले, सर्वसामान्य जनतेवर अन्याय झाल्यास लोक केंद्रीय मानवाधिकार संघटनाकडे धाव घेऊन न्याय मागत असतात. अशा लोकांसाठी आमची संघटना कायम तत्पर असते. आज अखेर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक लोक झालेल्या अन्यायबाबत आमच्याकडे न्याय मागत असतात. मात्र संघटना कोणाकडून ही कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. सामाजिक बांधिलकी जपत हे कार्य सुरू आहे. अवैध बेसुमार वाळू वाहतूक, अवैध वाळू उपसा, अशा अनेक विषयावर संघटनेकडून अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. गेल्या ८ वर्षांपासून हे कार्य सुरू असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.