दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । बारामती । कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेऊन आर्यनमॅन किताब पटकविणारा ओम सावळेपाटील याचे कार्य कौतुकास्पद असून इतर खेळाडूंनी त्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन वुडन फ्लोर च्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी प्रांताधिकारी दादासो कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले व एसओडी हनुमंत पाटील व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्तित होते. 180 किलोमीटर सायकलिंग करणे 3.8 किलोमीटर पोहणे व 42 किलोमीटर रनिंग करणे व सर्व नियम अटी पाळून सोळा तासाच्या आत पूर्ण करणे आणि आयर्न मॅन हा किताब पटवणे हे खडतर परिश्रम मुळे शक्य होते 62 देशा मधून आलेले दोन हजार स्पर्धक मधून 18 ते 24 वर्ष वयोगटात जागतिक स्तरावर क्रमांक पटकवल्यामुळे देशाची मान उंचावली आहे असेही पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन रवींद्र कराळे यांनी केले तर आभार अभिमन्यू इंगवले यांनी मानले.