महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसनासाठी होणारे काम कौतुकास्पद – श्रीमंत विश्वजितराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
गोळेगाव ठाकुरकी, ता. फलटण येथील महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसनासाठी करण्यात येणारे काम निश्चितच कौतुकास्पद असून या ठिकाणी दिव्यांग मुलांना देण्यात येणार्‍या संपूर्ण सोयी सुविधा या परिपूर्ण असल्याने या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी मोठे काम उभे राहतेय, असे प्रतिपादन फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते.

यावेळी श्रीमंत प्रियालक्ष्मीराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे, सौ. सायली बरडे, गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन महिला सक्षमीकरण लायन सौ. निलम लोंढे पाटील, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ पुनम पिसाळ, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. सुवर्णा खानविलकर, रंजना कुंभार, लायन्स क्लब प्लॅटिनमच्या अध्यक्षा सविता दोशी, संगिनी फोररमच्या अध्यक्षा संगीता दोशी, सौ. निना कोठारी, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्य सौ. प्रियांका पवार, महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, सौ. राजबाला बेडके, आकांक्षा क्लासेसचे संचालक संजय जाधव, प्राध्यापक दिलीप शिंदे, बाळासाहेब चोरमले, ओंकार चोरमले, अक्षय पाटील, रामचंद्र पिसाळ, विजय चोरमले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले की, कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले व वैशाली चोरमले यांनी या विद्यालयातील दिव्यांग मुलांना खूप जपलं असून या ठिकाणी कार्यरत असणार्‍या या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीप्ती देसाई व त्यांच्या सर्व शिक्षकांनी दिव्यांग मुलांना घडवून त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसन करण्याचे देखील केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असेच आहेत. महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विद्यालयांमध्ये शैक्षणिक सुविधांबरोबरच अनुदान नसतानाही निवासी मुलांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी सर्व क्लासरूम या डिजिटल असून त्याचबरोबर बोलक्या भिंती, अत्याधुनिक स्पीच रूम, संगणक लॅबोरेटरी, निवासी मुलांना बंक बेड, उच्च दर्जाचे जेवण, स्वच्छ पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून ते म्हणतात की, मी देखील माझ्या जीवनामध्ये दिव्यांग मुलांना खूप जपत आलो आहे. त्यामुळे दादासाहेब चोरमले यांच्या शाळेमध्ये आपली दिव्यांग मुलं निश्चितच सुखरूप आहेत. कारण या संस्थेच्या पाठीशी आम्ही राजे फॅमिली ठामपणे उभे आहोत, असे सांगून पुढे श्रीमंत विश्वजीतराजे म्हणतात की, मी व माझ्या मातोश्री पहिल्यांदाच एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला एकत्र आलो आहे आणि हा एक चांगला योगायोग दादासाहेब चोरमले व सौ. वैशाली चोरमले यांनी घडवून आणला.

याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय चतुर्थ व पाचव्या क्रमांक आलेल्या विजेत्या महिला स्पर्धकांना पैठणी साडीसह रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. तसेच जवळपास तब्बल १७ महिला भगिनींना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आकर्षक साड्या देण्यात आल्या व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू ही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
प्रास्ताविकामध्ये कृष्णात चोरमले यांनी संस्थेच्या प्रगतीचा व दिव्यांग मुलांसाठी काम करीत असताना येणारा आपला अनुभव सांगितला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करून झाली. यानंतर मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले व मुख्याध्यापिका दीप्ती देसाई यांनी केला. मान्यवरांचे आभार संस्थेच्या सचिव वैशाली चोरमले यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. वैशाली शिंदे, विजया मठपती, हेमा गोडसे, निर्मला चोरमले, अविनाश चोरमले, चैतन्य खरात, नितेश शिंदे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमास गणेश चोरमले, विजय चोरमले, भारती मॅडम, विटकर मॅडम, लहू चोरमले, चैतन्य खरात, नितेश शिंदे, सौ. रेश्मा चोरमले, सौ. सिंधु चोरमले, सौ. सुनिता चोरमले, प्रतीक्षा चोरमले सर, मूकबधिर विद्यालयाचे पालक, परिसरातील सर्व महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!