विरोधी पक्षनेते राणे साहेब आणि विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते गडकरी साहेब यांनी जे काम केलेले आहे, हे विसरता येणार नाही : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


यावर रामराजे यांनी सांगितले की, विधान परिषदेवर ७८ आमदार असतात. विधान सभेवर २८८ आमदार असतात. तेथे माझे जावईच सध्या अध्यक्ष आहेत. मी ज्या पद्धतीने विधान परिषद चालवली. मी निवडून कसा आलो? कै. शिवाजीराव देशमुख हे त्यावेळी काँग्रेस आयचे सभापती होते. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव होता. अविश्वासाचा ठराव राष्ट्रवादी आणि भाजपानं आणला. मला सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी मिळून निवडून दिलेले आहे. मला त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांनी सहकार्य केलेले आहे. चांगल्या प्रकाराने मी विधान परिषद चालवली. मी १५ वर्षे विधान परिषदेत काम केलेले आहे. तेथे कटुता असते, मात्र कामही होते, काम होत नाही, असे होत नाही. आरडाओरडा चालू राहतो, परंतु कामकाज होते. बिलावर चर्चा होत नाही, हे चुकीचे आहे. माझ्या काळात अर्ध्या अर्ध्या तासात मी बिले काढली आहेत विना चर्चेची. हे चुकीचे आहे. सर्व पार्टींनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढला तर ते होईल. विलासराव देशमुख कोईलिशन मिनिस्ट्री चालविण्यात फार एक्स्पर्ट होते. त्यांचे जे व्यक्तिमत्त्व होते, त्यांचा जरी पश्चिम महाराष्ट्राला विरोध होता तरी माझ्या फाईलवर त्यांनी सह्या केल्या आहेत. याला म्हणतात मुख्यमंत्री. थोडसं चालायचं राष्ट्रवादी – काँग्रेस, पण विलासरावांचं काम लक्षात ठेवण्यासारखं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं अकॅडमीक जास्त होतं. त्यांची लेवल वेगळी होती. यांना कोईलिशन मिनिस्ट्री चालवता येत नव्हती. ते दिल्लीतच योग्य होते. विरोधी पक्षनेते राणे साहेब आणि विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते गडकरी साहेब यांनी जे काम केलेले आहे, हे विसरता येणार नाही. ज्या पद्धतीने ते प्रश्न विचरायचे, मंत्री म्हणून उत्तरे देताना धडकी भरायची, असे हे दोघे होते. राणे साहेबांचा आत्ताचा अवतार आणि त्याकाळचा अवतार, हे अभ्यासू नेते होते. गडकरी साहेबांवर तर न बोललेलेच बरे! कारण त्यांना हातात कागद लागायचा नाही.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा…

शरद पवार साहेबांबद्दल सांगायचे झाले तर शरद पवारांचे आम्ही कामकाज पार्लमेंटमध्येही बघितलेले आहे. ते जेव्हा ७८ साली राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्व खात्यांची उत्तरे पवार साहेब देत होते. त्यांचे जे मंत्री होते, त्यांना विषयच माहीत नव्हते, हेच उत्तरे देत होते. हेही बघितलेलं आहे. आत्ताच्या तरुण आमदारांचा पॉझिटीव्ह विचार नाही. तेथे आडवाअडवी चालते. सती परंपरा, अंधश्रद्धेचा कायदा, कोविड अशा विषयांवर कोण बोलत नाही. नुसता आरडाओरडा करून चालत नाही. थोडक्यात सत्ता ही निगेटीव्ह कामासाठी की पॉझिटीव्ह कामासाठी जास्त वापरली जात आहे, याचा ऊहापोह झाला पाहिजे.

आत्ता खासदारांचे काय चालले आहे की, वैयक्तिक बोलले जात आहे. मी जे ३० वर्षे काम केलेले आहे, तेच खोडून काढायचे चालले आहे. हा राजकीय त्रास नाही. हा वैयक्तिक त्रास आहे. शरद पवार साहेबांना तर ६७ सालापासून मी बघितलेले आहे. एसटीने प्रवास केलेला बघितला आहे. हॉटेल रूपालीसमोर पिशवी अडकवून सायकलवर फिरताना बघितलेले आहे. मोदी साहेबांचे जर सांगायचे झाले तर मोदी साहेबांचे आणि माझे वाद झालेले होते. ते झाले होते नर्मदा पाण्यावरून. नर्मदा अ‍ॅथॉरिटी ही अपेक्स अ‍ॅथॉरिटी आहे. चार राज्यांशी संबंधित आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. त्याची अपेक्स कमिटी असते. त्याचे पंतप्रधान चेअरमन असतात, पण ते येत नाहीत. चरण सिंह त्या कमिटीचे चेअरमन होते. त्याची डिसेंबरमध्ये बैठक व्हायची. त्या बैठकीत असे ठरले होते की, चारही राज्यांचे पुनर्वसन डिसेंबरपर्यंत झाले असेल तर हो म्हणायचे, नाही म्हटले कोणी, तर पुढचे काम होत नाही. मेधा पाटकर यांचा नर्मदा अ‍ॅथॉरिटीला विरोध होता. मी त्यावेळी महाराष्ट्राचा प्रतिनिधी राज्यमंत्री होतो, माझा विरोध आहे म्हणून सांगितले. त्यावेळी बैठकच उठली. मोदीसाहेब म्हणाले, रामराजे साहेब आपने ए क्या किया? उमा भारतींशीही माझे त्यावेळी वाद झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला उपपंतप्रधान आडवाणी साहेबांचा फोन आला, त्यांनी विचारले की, कशासाठी तुम्ही अडविले. मी सांगितले की, तुम्ही पवार साहेबांना विचारा की का आडवलं ते. त्यावेळी दुसर्‍या दिवशीही मिनिस्ट्रीचा फोन आला, मी सांगितले की, आम्हाला तुम्ही पैसेच देत नसाल तर काय करायचे? हाच विषय होता की, ५० आणि ७५ टक्क्यांचा. ते म्हणाले की, एक धरण सांगा. मी म्हटले की, द्या धोम-बलकवडीला. असल्या सगळ्या भानगडी ऑफ द रेकॉर्ड खूप केल्या आहेत मी. दुसर्‍या आडवाणींशी बोलायला राज्यमंत्री म्हणून मीच होतो.

मी बर्‍याच गोष्टी केल्या, ज्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला आहे. मी महत्त्वकांक्षी नव्हतो, आजही नाही; परंतु जे गैर चालले आहे, ते मनात भिडतेय. ते आपल्याला दूर करावे लागणार आहे. आम्ही ते बदलणार म्हणजे बदलणार. मी यावेळेस ते बदलणार आहे. मी एकटाच विरोध करणार आहे. मी उभा राहून करीन किंवा माझ्या पद्धतीने करीन. मला इतकं भोळही समजू नका, अपक्षातनं राजकारण मी केलेलं आहे. राजकारणातला रामराजे हा वेगळा असतो, तुमच्यासमोर बसलेला हा राजकीय रामराजे नाही. राजकीय रामराजे बघायचे असतील तर फलटणला इलेक्शनच्या अगोदर सहा महिने या!


Back to top button
Don`t copy text!