शेतकरी केंद्रबिंदू मानून केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद – आमदार दिपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण बाजार समितीने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण यांनी काढले.

शेतकरी उत्पादनाच्या खरेदी-विक्रीच्या पुढे जाऊन बाजार समिती इतर सेवा देण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अशीच बाजार समितीची घोडदौड सुरू रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पणन विभागाचे घुले साहेब, माणिकराव सोनवलकर, संतोष जगताप (संचालक), शंभूराज पाटील (संचालक) यांना समयोचित मनोगते व्यक्त केली.

सूत्रसंचालन श्री. प्रमोद रणवरे यांनी केले. प्रास्ताविक श्री. शंकरराव सोनवलकर यांनी केले, तर आभार श्री. मोहनराव डांगे यांनी मानले.

सदर कार्यक्रमप्रसंगी पंपासाठी जागा देणारे गुलाबराव डांगे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रामुख्याने भाडळी बु., भाडळी खु., दुधेबावी, सासकल, तिरकवाडी, सोनवडी, झिरपवाडी, कोळकी परिसरातील मान्यवर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!