दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे भरलेल्या महिला भगिनींचे फॉर्ममधील मलठणमधील सर्वात जास्त फॉर्म ग्राह्य झाले आहेत. त्यामुळे आज रोजी बर्याच महिला भगिनींना ३००० रुपयांची भाऊबीज मिळाली आहे.
या भाऊबीजेमुळे महिलांनी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचे आभार मानले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वयोश्री योजनेचे फॉर्म भरणेही सुरू आहे. योजनेपासून राहिलेल्या महिलांनी संपर्क साधण्याचे आवाहन अशोकराव जाधव यांनी केले आहे.