
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीचा सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्यासाठीचा मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला होता. तद्नंतर आज म्हणजेच दि. ०५ जुलै २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. दि. ०९ जुलै २०२२ रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भावी नगरसेवकांनी मतदार यादीमध्ये नोंद केलेल्या हरकतीचा विचार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला कि हरकती फेटाळण्यात आल्या याचा उलघडा आज होणार आहे.