प्रतीक्षा संपली; दहावीचा निकाल आज जाहीर होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. उद्या बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. फलटण शहर व तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रावर या परीक्षेसाठी ४ हजार ६९४ विद्यार्थी/विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या असल्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी सांगितले.

यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.

विद्यार्थ्यांना खालील वेबसाइटवर दहावीचा निकाल पाहता येईल.

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahasscboard.in


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!