दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२३ | फलटण | सातारा येथे गुरुवारी झालेल्या एका बैठकीदरम्यान काही अल्पसंतुष्टी व्यक्तींनी त्या बैठकीचे फोटो काढून ते चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले. सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालेला तो मेसेज खोटा असून आम्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे व येथून पुढेही राहू, असे स्पष्टीकरण नाईकबोमवाडीचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते श्री. यशवंत जगन्नाथ कारंडे, तातमगिरी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. उदयसिंह शिवराम खुसपे, शेरेशिंदेवाडीचे माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. संदीप वसंत बुधनवर व नाईकबोमवाडीचे माजी सरपंच श्री. निवृत्ती वामन खुसपे यांनी दिले आहे.
शुक्रवारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन यशवंत कारंडे, उदयसिंह खुसपे, संदीप बुधनवर व निवृत्ती खुसपे यांनी खोट्या ‘व्हायरल’ झालेल्या मेसेजबद्दल संजीवराजेंना अवगत केले व येथून पुढेही आम्ही राष्ट्रवादी पक्षाबरोबरच राहणार असल्याची ग्वाही दिली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.