

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 02 (रणजित लेंभे) : गावानं जलसंधारणाची केलेले काम हे गावातल्या लोकांच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत यासाठी गावाने एकजुटीने राहिले पाहिजे असे प्रतिपादन ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा डॉ सोनाली शिंदे यांनी केले.
आसनगाव ता कोरेगाव येथे मागील महिन्यापासून सुरू असलेल्या पाझर तलावाच्या कामाचा आढावा घेत असताना त्यांनी ग्रामस्थांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानचे समन्वयक प्रशांत बोरावके संभाजीराव शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रदीप शिंदे वीरसिंग शिंदे प्रशांत शिंदे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते.
यावेळी प्रशांत बोरावके यांनी कामाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करताना राहिलेल्या पुन्हा दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या बोरावके म्हणाले येणाऱ्या येणाऱ्या पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे त्याचा ग्रामस्थांनी काटकसरीने वापर केला पाहिजे गावात अशा प्रकारे काम करण्यासाठी ग्रामस्थांनी आपले मतभेद बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सामूहिक निर्णय प्रक्रिया राबवावी.
ग्रामस्थांनी तलावाच्या कामाची चर्चा केल्यानंतर आगामी काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी जागा जागा निश्चित करून नियोजन केले आहे.

