गावकरी गाव सोडून जाण्यासाठी तयार नसतात; पण आता गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, मन वळवून सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली आहे – सुनील तटकरे


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई ।दरडग्रस्त गावांचे स्थलांतर करणे ही कायमस्वरूपी उपाययोजना हवी. रायगड जिल्ह्यातील जवळपास अशा ६०-७० गावांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. गावकरी गाव सोडून जाण्यासाठी तयार नसतात. पण आता गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, मन वळवून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान गावापासून जवळ आणि सुरक्षितस्थळी गावकऱ्यांचे स्थलांतर करण्याची निकडही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.

इर्शालवाडीतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एनडीआरएफचे पथक गेले चार दिवस महाडमध्ये आहे. इर्शालवाडीसाठी एक टीम पुण्याहून मागवण्यात आली आहे. अनेक अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी पालकमंत्री उदय सामंत, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आम्ही सर्वजण बचावकार्याचा आढावा घेत आहोत, अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!