कोपर्डे हे गाव ‘नारळाचे गाव’ म्हणून ओळखले जाईल – स्नेहलता चोरडिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
खंडाळा तालुक्यातील राजकीय वारसा असलेल्या गावात इनरव्हील क्लब, पुणे (प्लॅटिनम) यांच्या दातृत्वाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी ६०० नारळ वृक्षांचे लोकार्पण करण्यात आले. गावाबाहेरील असणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे वृक्ष लावण्यात आले. गावाच्या रस्त्याच्या दुतर्फी लावलेल्या नारळाच्या झाडाचा नक्कीच गावाला उत्पन्नाच्या रूपाने फायदा होईल व हे गाव एक दिवस ‘नारळाचे गाव’ म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन इनरव्हील क्लब पुणेच्या प्रेसिडेंट स्नेहल चोरडिया यांनी केले. .

कोपर्डे ग्रामस्थांच्या वतीने इनरव्हील क्लब पुण्याच्या प्रेसिडेंट स्नेहल चोरडिया व संपूर्ण टीमचा शाल, श्रीफळ व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. दिपक शिंदे यांनी गावच्या सरपंचपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आजवर त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक इनरव्हील क्लबच्या वतीने करणेत आले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

शहरातून येऊन ग्रामीण भागामध्ये काम करण्याची संधी आम्हाला आपल्याच गावाजवळील असणार्‍या व सध्या पुण्यात राहणार्‍या शेरेचीवाडी गावातील सामाजिक कार्यकर्त्या व इनरव्हील क्लब पुणेच्या कार्यतत्पर संचालिका जोतीताई धुमाळ यांच्या मुळेच आम्हाला मिळत असल्याने त्याचा फार मोठा आनंद आम्हास होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एक कल्पक दूरदृष्टी असलेले शिंदे हे या गावचे सरपंच असल्याने या गावात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, हेच आम्ही आमचे भाग्य समजतो. आजवर फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील असणार्‍या समस्या सोडवण्याचा यापूर्वीही इनरव्हील क्लब पुणे प्लॅटीयमच्या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचे त्यांनी आवर्जून बोलताना सांगितले.

सरपंच दिपक शिंदे यांच्या माध्यमातून वृक्ष लोकार्पण कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी ग्रामदैवत जोतिबा मंदिर, कोपर्डे येथे सकाळी ११ वा. घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब, पुणे (प्लॅटिनम) च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपणी, प्रेसिडेंट स्नेहल चोरडिया, सेक्रेटरी प्रीती शिरूडकर व सर्व महिला टीम सदस्या यांनी ६०० झाडे प्रायोजित केले. यामध्ये प्रामुख्याने ललिता कांकरिया, कांता गांधी, वैजयंती गांधी, संगीता मुथा, दमयंती अहिरराव व इतर सभासदांचा समावेश होता. विशेष सहकार्य सौ. ज्योती केशव धुमाळ आयएसओ पुणे प्लॅटिनम यांचे लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यसनमुक्त संघ, जिल्हा साताराचे अध्यक्ष व प्रवचनकार, व्याख्याते जगन्नांथ शिंदे यांनी केले.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब, पुणे (प्लॅटिनम) च्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देवून श्री. प्रमोद निंबाळकर, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा शेरीचीवाडी, श्री. अरविंद कांबळे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा शेरीचीवाडी, श्री. संजय शिंदे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा हिंगणदरा (हिंग.), श्रीमती स्वाती घोडके, उपशिक्षिका, जि. प. शाळा तांबवे, श्री. सागर शिंदे, उपशिक्षक जि.प. शाळा कोपर्डे, सौ. शारदा वायदंडे, मुख्याध्यापक जि.प. शाळा कोपर्डे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमास मा. दिपक शिंदे, सरपंच ग्रामपंचायत कोपर्डे, उपसरपंच व सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!