संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने बळ देणारी : प्रा. मिलिंद जोशी


स्थैर्य, सातारा, दि. 16 डिसेंबर :  सातारच्या संमेलनाच्या निमित्ताने चांगले, अनुकरणीय पायंडे पडल्याचा उल्लेख केला. संमेलन साहित्य, लेखक, प्रकाशक, वाचककेंद्री ठरेल कारण संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक असतील. साहित्य संमेलन ही साहित्यिक – सांस्कृतिक तशीच राजकीय घटनाही असते. ती समाजसहभागानेच यशस्वी होते. सातारकर आयोजकांनी संमेलनाची, साहित्यिकांची स्वायत्तता टिकवून धरण्याचा आदर्श निर्माण केला आहे. संमेलने एका साच्यात अडकल्यासारखी झाली असताना, या संमेलनाच्या निमित्ताने साचा मोडून नव्या वाटांची निर्मिती साधली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीत होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने पुढील साहित्यिक चळवळींना बळ पुरवतात, असेही जोशी म्हणाले.

सुनिताराजे पवार म्हणाल्या, संमेलनातील साचलेपणा जाऊन नवे प्रयोग या संमेलनात होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. परंपरा आणि परिवर्तनाच्या वाटेने हे संमेलन वेगळा वैचारिक संवाद घडवेल. संमेलनाच्या मंडपाची पायाभरणी करताना शब्द, विचार, परिवर्तन आणि संवादाचा पाया भरला गेला आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले, बराच खंड पडल्यानंतर हे संमेलन सातारकरांना मिळाले आहे. तो खंडित प्रवाह वाहता ठेवण्याचा प्रयत्न 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्रितपणे करू.

नंदकुमार सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप शाखेचे सभासद वझिर नदाफ, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी केले. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी मानले.

स्वागताध्यक्षांचा कुठलाही हस्तक्षेप नाही

साचा मोडला की, नव्या वाटा निर्माण होतात. साहित्य संमेलन हे स्वायत्त व्यासपीठ आहे त्याची स्वायत्तता जपली गेली पाहिजे. महामंडळाने संमेलन आयोजक संस्थेला दिले की आयोजकांचा महामंडळाशी संपर्क रहात नाही. पण सातारा येथील परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. संमेलनाचे स्वागाताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत कुठल्याही हस्तक्षेप केलेला नाही. कविसंमेलन कुण्याच्या अध्यक्षतेखाली घ्यावे, परिसंवादात कुणाचा सहभाग असावा यासाठी कुठलाही दबाव आणलेला नाही, अशा शब्दात प्रा. मिलिंद जोशी यांनी श्रीमंत छत्रपती शिवजेंद्रराजे भोसले यांचे कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!