स्थैर्य, दि.१: चार राज्यांमध्ये कोरोना व्हॅक्सीनेशनच्या तयारीची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर केंद्र सरकारने आता संपूर्ण देशात ड्राय रन करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जानेवारीला सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी ड्राय रन घेण्यात येईल. यासाठी राजधानींमध्ये तीन पॉइंट ठरवण्यात येतील. राज्यांना सूट असेल की, ते या प्रोसेसमध्ये दूरच्या अशा जिल्ह्यांना सामिल करु शकतात, जेथे व्हॅक्सीन पोहोचणे कठीण आहे.
राज्यांसह हायलेव्हल मीटिंगनंतर हेल्थ मिनिस्ट्रीने गुरुवारी सांगितले की, या मेगा ड्रिलचा हेतू कोल्ड चेन मॅनेजमेंट, व्हॅक्सीनचा सप्लाय, स्टोरेज आणि लॉजिस्टिक्स व्यतिरिक्त संपूर्ण मशीनरीची तयारी पाहणे आहे. देशात सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र आणि केरळ आपल्या राजधानीसह काही मोठ्या शहरांमध्येही ड्राय-रन करु शकतात.
गेल्या 28 आणि 29 डिसेंबरला पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दोन-दोन जिल्ह्यांमध्ये व्हॅक्सीनेशनसाठी मशीनरीच्या तयारीची चाचणी घेण्यात आली होती.
प्रत्येक पॉइंटवर 25 हेल्थ वर्कर शामिल होतील
महाराष्ट्र आणि केरळने ठरवले आहे की, राजधानी व्यतिरिक्त आपल्या मोठ्या शहरांमध्येही ड्रायरन करतील. केंद्र सरकारने 20 डिसेंबरला यासाठी गाइडलाइन्स जारी केली होती. यासाठी मेडिकल ऑफिसर इंचार्ज व्हॅक्सीनेशन प्रोसेसमध्ये भाग घेणाऱ्या 25 हेल्थ वर्करची लिस्ट तयार करतील. राज्यांना हे ठरवावे लागेल की, त्यांचा डेटा को-विनवर अपलोड व्हावा. हे हेल्थ वर्कर ड्राय रनच्या वेळी उपस्थित राहतील.
ड्राय रनमध्ये काय आहे?
आतापर्यंत सरकार केवळ मुलांना आणि गरोदर महिलांनाच व्हॅक्सीनेट करत होते. यासाठीही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आठवड्याचा एक दिवस ठरवण्यात येतो. ही पहिली वेळ आहे जेव्हा देशात प्रौढ जनतेलाही व्हॅक्सीनेट केले जाईल. यामुळे व्हॅक्सीनेशन ड्राइव्हसाठी सरकारी मशीनरीची तयारी पाहण्यासाठी केंद्र सरकार ड्राय रन करुन घेत आहे.
यामध्ये राज्यांमध्ये कोल्ड चेनने व्हॅक्सीनेशन साइट्सपर्यंत व्हॅक्सीन आणणे-घेऊन जाण्याच्या प्रक्रियेची चाचणी घेतली जाईल. अशा प्रकारे व्हॅक्सीनेशन साइट्सवर कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न होईल.
पूर्ण प्रोसेसची अशी घेतली जाणार चाचणी
ड्राय रनमध्ये कोविन (Co-WIN) वर आवश्यक डेटा एंट्री होईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हॅक्सीन डिलीव्हरी, टेस्टिंगची रिसीप्ट आणि आवंटन, टीम मेंबर्सची नियुक्ती, लसीकरण स्थळांवर मॉक ड्रिलचे परीक्षण केले जाईल.
कोविड-19 व्हॅक्सीनसाठी कोल्ड स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट्सची रियल-टाइम ट्रॅकिंगचा यामध्ये समावेश आहे. लसीकरण स्थळांवर गर्दीचे व्यवस्थापन करण्याबरोबरच फिजिकल डिस्टेंसिंग देखील पाहिले जात आहे.