धरणात बुडून दोन भावांचा करुण अंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, परभणी, 1 : जिंतूर तालुक्यातील वझर गावामध्ये आज सकाळी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

वझर गावाच्या सीमेवर असलेल्या धरणांमध्ये गावात राहणाऱ्या 18 वर्षीय ओम पजई आणि 16 वर्षीय महेश पजई हे दोन युवक सकाळी पोहण्यासाठी गेले होते. परंतु अचानक हे दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यातच त्यांचा अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांच्या शरीरात गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहिल्यावर त्यांना गावातील शासकीय रुग्णल्यात हलवण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी नसल्याने शेवटी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने पजई कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या निधनाचं वृत्त समताच पजई कुटुंबाने मोठा आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेनंतर वझर गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!