यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षक वर्ग… |
स्थैर्य, सातारा, दि.६: विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निकचा २०१९-२० या वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. मागील पाचही वर्षाप्रमाणे या वर्षीही अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतनचा निकाल उच्चांकी लागला असून उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्याचे काम तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिकेतर सेवकांनी केले आहे असे गौरवोद्गार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.
तंत्रनिकेतनमधील तृतीय वर्षामध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या सरकार प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य एस. यु. धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलावडे, अधिक्षक एस. एस. भोसले, छ. शाह आय टी आय चे प्रायार्य विजय मोहिते यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तंत्रनिकेतनमधील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील विशार्थीनी श्रद्धा दिलीप घाडगे हिने ९९.२१ टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तनया अनिल जाधव हिने ९८.८२ टक्के गुण मिळवून व्दितीय, इले, अँडटेलिकम्युनिकेशन विभागातीलसायली शहाजी नलावडे हिने ९८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच तंत्रनिकेतनमधील ६३ विध्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व विध्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.गतवर्षीचा तंत्रनिकेतनचा निकाल पाहता येथील शिक्षक स्टाफची गुणवत्ता व अनुभव विध्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी चांगला उपयोगी पडत असल्याचे सौ. वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.
१७ ऑगस्ट २०२० पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून वर्ग सुरु केले आहेत. कॉम्प्युटर इंजि., इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इले. अँड टेलिकम्युनिकेशन, मेनिकल इंजि. या विभागातील विद्यार्थीकरीता तंत्रनिकेतनमधील सर्व शिक्षक सकाळी ११ ते दुपारी ३.३० यावेळेत ऑनलाईन माध्यमातून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. यासाठी तंत्रनिकेतनचे सर्व शिक्षक ई कन्टेन्ट चा वापर महणजे पीपीटी, व्हिडीओ आदीचा वापर करत विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. या तंत्रनिकेतनच्या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण ५३२ विध्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. प्रथम व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी तनिकेतनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य धुमाळ यांनी याप्रसंगी केले.