‘लक्ष्मी बॉम्ब’चे शीर्षक बदलले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२९: अक्षय कुमार स्टारर हॉरर कॉमेडी
फिल्म ‘लक्ष्मी बॉम्ब’चे शीर्षक बदलून फक्त ‘लक्ष्मी’ करण्यात आले आहे.
गुरुवारी चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स प्रमाणपत्र घेण्यासाठी सेन्सॉर
बोर्डाकडे गेले होते. स्क्रिनिंगनंतर मेकर्सनी सीबीएफसीशी चर्चा केली.
प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार
कपूर आणि अक्षय कुमार यांनी हे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.

एक दिवस आधी करणी सेनेने दिली होती धमकी

बुधवारी
अखिल भारतीय राजपूत करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली
होती. चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,
अशी धमकी त्यांनी दिली होती. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनेक संस्थांनी केला होता.

मुकेश खन्नाही शीर्षकावर होते नाराज

‘लक्ष्मी
बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावा संदर्भात नाराजी व्यक्त करत, अभिनेते मुकेश
खन्ना सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये ते
म्हणाले होते, ‘लक्ष्मीसमोर बॉम्ब हा शब्द लिहिणे ही गोष्ट अतिशय निंदनीय
आहे. व्यावसायिक हितसंबंधांचा विचार करून हा खोडकरपणा करण्यात आला आहे. मग
त्याला मंजुरी मिळावी का? अर्थात, अजिबात नाही. आपण ‘अल्लाह बॉम्ब’ किंवा
‘बदमाश जिझस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकतो का? नाही ना? मग लक्ष्मी बॉम्ब
कसे ठेवता?’, असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.

म्हणून ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे शीर्षक ठेवण्यात आले होते

एका
मुलाखतीत राघव लॉरेन्स म्हणाले होते की, “आमच्या तामिळ चित्रपटाचे मुख्य
नाव ‘कांचना’ असे ठेवले गेले होते. कांचना म्हणजे सोन्याचे म्हणजे
लक्ष्मीचे एक रूप आहे. हिंदी रिमेकचे प्रारंभी शीर्षक होते मलाही ते
ठेवायचे होते. त्यानंतर हिंदी प्रेक्षकांना या नावाने आवाहन करायला हवे आणि
त्यासाठी लक्ष्मीपेक्षा चांगले काय असू शकते, हे एकत्रितपणे ठरवले.”

राघव
पुढे म्हणाले होते, “देवाच्या कृपेने हा चित्रपट (कांचना) एक स्फोट होता.
म्हणून आम्ही त्याचे नाव (हिंदी रिमेक) ठेवले “लक्ष्मी बॉम्ब’ लक्ष्मी
शक्तिशाली आणि तेजस्वी आहे. म्हणून चित्रपटाचे नाव योग्य आहे”, असे त्यांनी
सांगितले होते.

या चित्रपटावर लव्ह जिहाद प्रचार केल्याचा आरोप

‘लक्ष्मी’मध्ये
अक्षय कुमारने आसिफची भूमिका साकारली आहे, जो प्रिया (कियारा अडवाणी) या
हिंदू मुलीशी लग्न करतो. चित्रपटाच्या स्टोरीचा खुलासा झाल्यापासून या
चित्रपटावर लव्ह-जिहादचा प्रचार केल्याचा आरोप केला जात आहे आणि यावर
बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!